राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडीओ चा “पार्ट-टु” येणार

मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या रिंगणात उतरली आहे, पण लोकसभेला राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओ म्हणत घेतलेल्या सभा गाजल्या होत्या.  अशा पद्धतीचा दृक श्राव्य माध्यमांचा वापर अद्याप विधानसभेच्या प्रचारात झाला नाही. यावर अजून आठ दहा दिवस बाकी आहेत त्यामुळे लाव रे तो व्हिडीओ चा दुसरा पार्ट येणार असल्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या वेळी ईव्हीएम वर बोलताना राज म्हणाले भारतात निवडणुका या व्हलेट पेपरवरच व्हायला हव्यात, कारण जर ज्या देशात ईव्हीएम तयार होतात तोच देश व्हलेट पेपरवर निवडणूक घेत असतील तर आपण का त्यांच्या यंत्रावर निवडणुका घेतोय. त्यामुळे माझा आजही ईव्हीएम वर विश्वास नाही असं राज यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच ईडी च्या नोटीस संदर्भात बोलताना राज म्हणले जर माझे हात दगडाखाली असते तर मी सरकारच्या अंगावर गेलोच नसतो, त्यामुळे ईडीच्या नोटीशीला मी भीक घालत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपा  सरकार म्हणतंय ईडी मध्ये आमचा हस्तक्षेप नाही. मग इडीलाही आता राजकारण कळायला लागले का असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.

तसेच बाळासाहेबांच्या अटकेबद्दल अजित पवारांनि केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेना करत आहे. पण त्यांनी भुजबळांना सह कुटुंब मातोश्रीवर भोजनासाठी बोलवलं होत. त्याच काय असाही सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणूक लढवीत असून, त्या ठिकाणी मला जे वाटलं ते मी केलं. म्हणून मनसेने वरळीत उमेदवार दिला नसल्याचे राज यांनी स्पष्ट केलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)