गाय संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने पाच अधिकारी निलंबित

लखनौ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाय संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने महाराजगंजचे जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून मुख्य सचिव आर. तिवारी यांनी महाराजगंजचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) अमरनाथ उपाध्याय, उपजिल्हाधिकारी (एसडीएम) देवेंद्र कुमार आणि सत्यम मिश्रा, मुख्य प्राणी अधिकारी राजीव उपाध्याय आणि मुख्य उप पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. के. मौर्य यांना त्वरित निलंबित केले. या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्य सचिव आर. तिवारी म्हणाले, “महाराजगंज जिल्ह्यातील मधुबलीया गौ सदन येथे देखभाल करताना अनियमितता आढळल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह पाच अधिका्यांना निलंबित करण्यात आले आहे.” तिवारी म्हणाले, “तपासणीत असे आढळले आहे की नोंदीनुसार येथे 2500 गोवंश असायला पाहिजे होते. मात्र तपासणीत केवळ 900 गोवंश आढळले. हा गंभीर हलगर्जीपणा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.