मुंबई – दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली झाली आहे. दादांनी गुप्त पद्धतीने काकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 या परिसरात 73 नंबरच्या एका व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचे देखील बोलले जात आहे. या सर्व घडामोडींवर आता मनसे अध्यक्ष्य राज ठाकरेंनी मोठं विधान केलं असून, सध्या त्यांचं हे व्यक्तव चांगलंच चर्चेत आलं आहे.
आज मुंबईतील वांद्रे एमआयजी क्लबमध्ये मनसेचे बैठक पार पडली असून, यावेळी मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या या गुप्त बैठकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “एक टीम आधी पाठवली आहे दुसरी पण लवकरच जाणार आहे. आतून सगळे ऐकमेकांना मिळाले आहेत. 2014 सालापासून हे सर्व सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्याची जागा ‘चोर’डीया यांच्या घरीच मिळाली हे कमाल आहे.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
गुप्त बैठकीवर शरद पवार काय म्हणाले? वाचा….
अजित पवार माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडिलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो, तर ही माध्यमांची किंवा वर्तमानपत्रातील चर्चा होऊ शकत नाही.
या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. भाजपची विचारधारा राष्ट्रवादीच्या अर्थात आमच्या चौकटीत बसत नाही, असे परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, भाजपबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का?
असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपबरोबर जाणार नाही. असं देखील पवार यावेळी म्हणाले.