राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन; म्हणाले ‘महाराष्ट्र सैनिकांनो…’

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये राज ठाकरेंनी १४ जून रोजी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.

राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात.

परंतु मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर करोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी हे पत्र लिहले आहे. मागील वर्षी सुद्धा राज यांनी अश्याच प्रकारचे एक पत्र मनसे सैनिकांसाठी लिहले होते.

राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले आहे.

वाचा राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र…

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो, तुम्ही फार प्रेमानं अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, ऊर्जा मिळते. 

तशी ऊर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे, तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीनं वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्यानं खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहत असतो.

मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखचं. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. 

परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसांत १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले आणि १,६४,७४३ जण आताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वैगेरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.