पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सोमवारपासून ‘या’ वेळेत सर्व दुकाने, मॉल्स उघडणार; अजित पवारांची माहिती

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना आनंदाची बातमी दिली आहे. सोमवारपासून पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला आहे. त्यामुळे  प्रशासनाने लगेच निर्बंध बदलले  असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती.

पुणे शहरात आता दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहणार आहेत. या बरोबरच हॉटेलदेखील रात्री १० पर्यंत सुरू राहतील. थिएटर तसेच हॉल ५०% क्षमतेने सुरू राहतील. तसेच अभ्यासिका ग्रंथालये देखील ५०% क्षमतेने सुरू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी १४ तारखेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. “पुढील दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट किती आहे हे पाहिलं जाईल. त्यानंतर जर हाच ट्रेण्ड कायम राहिला तर सोमवार पासून नवीन आदेशांची अंमलबजावणी होईल.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.