वाघोली (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून पत्रकार भवनाची प्रलंबित असलेली मागणी अखेर वाघोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांच्या सक्रीय पुढाकाराने पूर्ण झाली आहे.
वाघोली येथील ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बांधकाम करून तयार असलेल्या सर्व सुविधानिशी दोन खोल्या देण्यात आल्यामुळे पत्रकारांनी ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांचे आभार मानले आहेत.
पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ असून अहोरात्र सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतो. काम करता असताना जीवाची तमा न बाळगता दीनदुबळ्याचे प्रश्न सोडवण्याचे काम करत असतो.
सतत कार्यरत असल्यामुळे थोडीफार विश्रांती मिळावी या दृष्टीने पत्रकार भवन हे हक्काचे असते. त्यामुळे अनेक वर्षांपासून वाघोली येथे पत्रकार भवन व्हावे अशी मागणी पत्रकारांनी केली होती. परंतु अद्यापही पत्रकार भवनासाठी कोणी ठोस पुढाकार घेतला नव्हता.
परंतु दि. ९ जून रोजी वाघोली येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांनी पत्रकारांना त्यांच्या हक्काचे पत्रकार भवन मिळावे यासाठी तातडीने ठोस निर्णय
घेऊन वाघोली ग्रामपंचायतीच्या आवारातील सुर्व सुविधानिशी दोन खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून पत्रकार भवनाचा प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी स्वतःहून पत्रकार भवनासाठी पुढाकार घेवून ग्रामपंचायत आवारामधील सर्व सुविधानिशी दोन खोल्या उपलब्ध करून दिल्या असल्यामुळे पत्रकारांच्या वतीने त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
– दीपक नायक (पुणे जिल्हाध्यक्ष, अ. भा. ग्रा. पत्रकार संघ)
वाघोली येथील ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांनी जेष्ठ पत्रकार दत्तात्रय गायकवाड, लोणीकंद शहर वाहतूक शाखेचे सहा.
पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांच्या उपस्थित सर्व सुविधानिशी ग्रामपंचायतच्या आवारात दोन खोल्या उपलब्ध करून दिल्यामुळे मुळे खऱ्या अर्थाने अनेक वर्षांपासून रखडलेला पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.