मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रेखाटलेल्या व्यंगचित्राची नेहमीच चर्चा होत असते, अशात राज ठाकरे यांच्या हस्ते जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान, राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला.
त्यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर केवळ तीन मिनिटांत राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले आणि ते पूर्ण होताच आता पुढे काय लिहू, “आता गप्पा बसा”, असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करत आहेत. तसेच नव्या अध्यक्ष निवडीसाठी पवारांनी घोषित केलेल्या समितीने एकमताने त्यांचा राजीनामा मंजूर करावा अशी मागणी कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडे करत आहेत. याच विषयावर आज प्रदेश कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी अजित पवार कार्यालयात येताच आंदोलक कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा दिलेल्या पाहायला मिळाल्या.