मुंबई – अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री सान्या मल्होत्रा रातोरात फिल्मी जगतात प्रकाश झोतात आली. त्यानंतर सान्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. नुकतेच सान्याने नवं घर खरेदी केलंन आहे. या नव्या आलिशान फ्लॅटमधील गृहप्रवेश करतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सान्याने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर गृहप्रवेशाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सोबतच तिने ‘नवीन घर’ असे कॅप्शन या पोस्टला दिले आहे. या पोस्टद्वारे तिने नव्या घराची झलकही चाहत्यांना दिली आहे. सान्याने गृहप्रवेशासाठी ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली असून तिच्या या पारंपरिक पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या सान्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सान्याने ‘दंगल’ या चित्रपटात बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या आधी सान्याने ‘लूडो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय तिच्या ‘बधाई हो’ चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तिने अभिनेता आयुषमान खुरानासोबत काम केले होते. सध्या सान्या मल्होत्रा ‘कटहल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
View this post on Instagram