मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करत आहेत. तसेच नव्या अध्यक्ष निवडीसाठी पवारांनी घोषित केलेल्या समितीने एकमताने त्यांचा राजीनामा नामंजूर करावा अशी मागणी कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडे करत आहेत. याच विषयावर आज प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी दिलेला राजीनामा फेटाळण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवारांनी नेमून दिलेल्या समितीची आज मुंबईतील प्रदेशाध्यक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने एक ठराव मंजूर केला यात शरद पवारांनी दिलेला राजीनामा फेटाळून लावण्यात आला. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी त्यावेळी त्यांनी,“राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दु:ख आणि वेदना आहेत. शरद पवारांनी जी जबाबदारी समितीवर दिली होती, त्याची बैठक पार पडली. समितीने बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शरद पवारांचा राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात येत आहे. त्यांची सर्वानुमते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना 2 मेच्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी पक्षाचा अध्यक्ष पदावर दुसऱ्याने राहावं अशी सूचना केली होती. समिती देखील गठित केली होती. मी पक्षचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्याची जबाबदारी दिली होती. त्यादिवशी ते जे काही बोलले त्यामुळे आम्ही स्थब्ध झालो होतो. ते असा राजीनामा निर्णय जाहीर करतील याची कोणाला कल्पना नव्हती. सर्वांची भावना शरद पवार यांनी अध्यक्ष राहावं अशी होती. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतर अनेकजण त्यांना भेटून गेले.
सर्वांनी मिळून विनंती केली की देशाला तुमची गरज आहे. नाव आणि अधारस्तंभ तुम्हीच आहात. देशात सन्मानित नेता फक्त शरद पवार आहेत. परवा पंजाबला आम्ही गेलो होतो त्यावेळी पंजाबचे शेतकरी भेटले ते म्हणत होते पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम विसरु शकत नाही. मागील 2 ते 3 दिवसांत देशातील दिग्गज नेते शरद पवार यांना भेटून जात होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची भावना पाहायला मिळत होती. पक्षात अनेक मान्यवर राज्यांत आणि देशातील अनेकजण विनंती करत होते की त्यांनी पद सोडू नये.
देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे तो भेटायला येतं आहे. आम्ही त्यांच्या भावना दुर्लक्षित करु शकत नाही. त्यांनी आम्हाला विचारात न घेता निर्णय घेतला. त्यामुळे स्वाभाविक आहे की दररोज भेटून आम्ही विनंती करत होतो की त्यांनी निर्णय मागे घ्यावा.
आम्ही आज ठराव पारित केला आहे. आम्ही हा ठराव घेऊन पवारांना भेटायचा प्रयत्न करु. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत. देशातील कोट्यवधी लोकांचा विचार करुन निर्णय मागे घ्यावा हा विनंती करणार आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले.