Raj Thackeray | Lok Sabha Election 2024 | Sanjay Raut – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खरपूस टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी तयार केलेली संघटना जेव्हा महाराष्ट्राच्या “शत्रूंना” पाठीशी घालते तेव्हा लोकांच्या मनात शंका निर्माण होते.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढत आहे.आणि ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रच्या अस्मितेसाठी महत्वाची आहे. भाजपने या अस्मितेवर घाला घालण्यासाठी सर्व भ्रष्ट नेत्यांना आपल्या गोटात घेतले आहे.
महाराष्ट्रातून उद्योगधंदे हाकलले जात आहेत, मुंबई तोडण्याचे आणि पंगू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्थापन झालेला पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठीशी घालत असेल, तर लोकांच्या मनात एक शंका निर्माण होते. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
अलविदा मनसे…! बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंच्या शिलेदाराचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या शिलेदाराने पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केलाय. राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भूमिकेनंतर मनसेच्या सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला. ‘अलविदा मनसे’ म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी मनसेलाअखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली, असे किर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray Speech ।
>> भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे. डॉक्टर व नर्सेसना इलेक्शन ड्युटी लावल्यावरून सुनावले.
>> डॉक्टर व नर्सेसने इलेक्शन ड्युटीवर जाऊ नये, मी बघतो कोण तुम्हाला नौकरीवरून काढतो – राज ठाकरेंचा एल्गार
>> अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत १२ तास वाट पाहावी लागली, अशा वावड्या माध्यमांनी उडवल्या – राज ठाकरेंचा आरोप
>>> राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशी वृत्त दिलं, शिवसेना प्रमुख व्हायचं असत तर तेव्हाच झालो असतो – राज ठाकरे
>>> बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यामुळेच स्वतःच पक्ष काढला – राज ठाकरे
>>> अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागावाटपाची चर्चा झाली – राज ठाकरे
>>> भाजपने त्यांच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली. ती मी नाकारली. रेल्वे इंजिन या चिन्हावर तडजोड नाही – राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
>>> बाळासाहेब १९८० साली इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेले, भेटीसाठी जाण्यात कमीपणा कसला – राज ठाकरे
>>> शिवसेना-भाजप युतीमुळे भाजपसोबत जवळचे संबंध – राज ठाकरे
>>> देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे बोलणारा राज ठाकरे पहिला माणूस – राज ठाकरेंचे वक्तव्य
>>> ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले – राज ठाकरे
>>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत, उद्धव ठाकरे ज्या भाषेत टीका करतात, तशी मी केलेली नाही – राज ठाकरे
>>> बाकी सगळं सोडून तरुणांकडे लक्ष द्या, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अपेक्षा – राज ठाकरे
>>> येणारी लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणार. आपण खड्ड्यात जाणार की वर जाणार हे ही निवडणूक ठरवणार – राज ठाकरे
>>> आज हाणामारी, विधानसभेला कोथळे बाहेर काढतील – राज ठाकरे
>>> व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका – राज ठाकरेंचं जनतेकडे मागणं
>> फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे
>>> विधानसभेच्या तयारीला लागा – मनसे कार्यकर्त्यांना आवाहन