Raj Thackeray Letter : राज्यात सध्या सर्वच पक्षांकडून लोकसभेची मोर्चेबांधणी सुरु आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पक्षातील ठिकठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. अशात राज ठाकरे यांनी मनसैनिकांसाठी एक संदेश जारी केला आहे. राज यांनी स्वतः पत्र लिहून या संदेश दिला आहे.
‘सस्नेह जय महाराष्ट्र.. अशी या पात्राची सुरुवात करण्यात आली आहे. या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे. त्यांनी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांना भावाप्रमाणे वागविण्याचे आवाहन यातून केले आहे.मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून राज ठाकरेंचा हा संदेश सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. | Raj Thackeray Letter
देशाच्या,राज्याच्या राजकारणाला आयाराम गयाराम संस्कृतीने घेरलेलं असताना, पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा उपऱ्यांना अवास्तव महत्व आलेलं असताना, ‘प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखं जपा ! कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, त्याला सहकारी म्हणा’ असा स्पष्ट आदेश आपल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी स्वतः पत्र लिहून कळवळा आहे. | Raj Thackeray Letter
देशाच्या,राज्याच्या राजकारणाला आयाराम गयाराम संस्कृतीने घेरलेलं असताना, पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा उपऱ्यांना अवास्तव महत्व आलेलं असताना, ‘प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखं जपा !कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, त्याला सहकारी म्हणा.’ असा स्पष्ट आदेश आपल्या पदाधिकाऱ्यांना… pic.twitter.com/xavZ8OVqYd
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 6, 2024
आगामी लोकसभेच्या दृष्टीने ७ ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे हे नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ११ मार्च रोजी दक्षिण मुंबई, १२ मार्च रोजी दक्षिण मध्य मुंबई, १३ मार्च उत्तर मध्य मुंबई, १४ मार्च इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाला राज ठाकरे भेट देऊन ते बैठका घेणार आहेत. अशात त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या संदेशाची चांगलीच चर्चा आहे. | Raj Thackeray Letter
Pushpa 2 मध्ये सिने सृष्टीतील सर्वात मोठ्या खलनायकाची एंट्री ? अल्लू अर्जुनसोबत करणार राडा