Navneet Rana Threatened : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याविरोधातही आक्षेपार्ह शब्द आहेत. याप्रकरणी राणा यांच्या पीएने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांतर्गत विनयभंग आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. | Navneet Rana Threatened
मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये त्यांच्या फोनवर धमकीचा कॉल आला होता. व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आलेल्या संदेशात अफगाणिस्तानसह पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आल्याचे देखील समजते. | Navneet Rana Threatened
नवनीत राणा यांचा ओवैसीवर आरोप
खासदार नवनीत राणा यांनी धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी ओवीसी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभेत ओवैसी यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आम्हाला धमक्या आल्याचे राणा यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी आपण रश्मी शुक्ला यांच्याशी देखील चर्चा केल्याचे राणा यांनी म्हटले. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. | Navneet Rana Threatened