Raj Thackeray backs Narendra Modi – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. २०१९ निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचाराचे रान पेटवलेल्या राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांच्या निर्णयावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले सचिन अहिर? | Raj Thackeray backs Narendra Modi
राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर बोलताना अहिर यांनी, मनसे कार्यकर्त्यानमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचा दावा केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले. अहिर यांच्या टीकेला आता मनसेतर्फे काय उत्तर देण्यात येते हे पाहावे लागेल.
भाजप नेत्यांकडून राज ठाकरे यांचे स्वागत
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस,आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
राज ठाकरेंचा पाठिंबा पण अद्यापही हे प्रश्न अनुत्तरित… | Raj Thackeray backs Narendra Modi
>>२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींविरोधात सभा घेतलेले राज ठाकरे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या बाजूने सभा घेणार का?
>>एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा प्रचार राज ठाकरे करणार का?
>>विधानसभा निवडणुका राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसह एकत्र लढणार?