BJP 10th list | Lok Sabha Election 2024 – भाजपने आज (बुधवारी) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. यात उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री जयवीर सिंग ठाकूर यांना मैनपुरी मतदारसंघातून सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या विरोधात उभे केले आहे.
आज भाजपने जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांपैकी सात उत्तर प्रदेशातील आहेत. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र माजी खासदार नीरज शेखर यांना बलिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून विद्यमान खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांना डावलले आहे. । BJP 10th list | Lok Sabha Election 2024
BJP releases its 10th list of candidates for the Lok Sabha elections.#LokSabaElection2024 pic.twitter.com/gyPPEm7Z40
— ANI (@ANI) April 10, 2024
अलाहाबादमध्ये पक्षाने विद्यमान खासदार रिटा बहुगुणा जोशी यांना तिकीट नाकारले आणि त्यांच्या जागी नीरज त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली. कौशांबी मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार विनोद सोनकर यांना कायम ठेवण्यात आले आहे,
तर फुलपूर मतदारसंघातून प्रवीण पटेल यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. बीपी सरोज यांना मछलीशहर जागेवरून आणि पारस नाथ राय यांना गाझीपूरमधून भाजपचे उमेदवार बनवण्यात आले आहे. । BJP 10th list | Lok Sabha Election 2024