Shahid Kapoor and Vijay Deverakonda| बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांनी नुकतेच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दरम्यानचा दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाला किस करताना दिसत आहे. तसेच शाहिदने विजयचे आभार मानले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये शाहिद कपूर विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरसोबत स्टेजवर दिसत आहे. यादरम्यान शाहिद विजयच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि म्हणतो, “विजय देवरकोंडा नसता तर ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटाचा रिमेक कधीच बनला नसता. तु नसता तर ‘कबीर सिंग’ कधीच बनला नसता. मी तुला खूप प्रेम करतो. मला तू खूप आवडतोस. धन्यवाद विजय.”
View this post on Instagram
दरम्यान, 2019 मध्ये रिलीज झालेला शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक होता. अर्जुन रेड्डीमध्ये विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे मुख्य भूमिकेत होते. ‘कबीर सिंग’मध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘कबीर सिंग’ हा शाहिद कपूर अभिनीत 2019 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. Shahid Kapoor and Vijay Deverakonda|
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहिद कपूर शेवटचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होती. आता ॲमेझॉन प्राइमच्या ‘अश्वथामा’ या चित्रपटात अभिनेता दिसणार आहे. तर विजय देवरकोंडा फॅमिली स्टारमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. हे दोन्ही अभिनेते देशभरात लोकप्रिय आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे जगभरात लाखो चाहते आहेत. Shahid Kapoor and Vijay Deverakonda|
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीमुळे ‘युपीएससी’ परीक्षेच्या तारखेत बदल; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा