मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे. पॉर्न फिल्म्स निर्मितीप्रकरणी प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. सोमवार दि १९ जुलै २०२१ ला दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
Businessman Raj Kundra has been arrested by the Crime Branch in a case relating to creation of pornographic films & publishing them through some apps. He appears to be the key conspirator. We have sufficient evidence regarding this: Mumbai Police Commissioner pic.twitter.com/LbtBfG4jJc
— ANI (@ANI) July 19, 2021
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार,फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लील चित्रपट रेकॉर्ड करणे आणि ते प्रसिद्ध केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर सोमवार दि १९ ला संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचं सांगत राज कुंद्रा यांना अटक केली.
पॉर्न फिल्म्स निर्मिती प्रकरणी यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठ व मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक केली होती. पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा. गहनाकडून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून 2 जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करीत होती.
यापूर्वी, उद्योगपतीने सचिन जे. जोशी यांनी पोलिसात मार्च 2020 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं.