Salman Khan’s house | Mumbai Crime Branch – अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानासमोर रविवारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबईच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहेत. या गोळीबाराची राज्य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आणि त्याच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पण आज नवी मुंबईतून ज्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या दोघांना ताब्यात घेण्याआधी पोलिसांकडून या घटनेत वापरलेल्या दुचाकीचा शोध घेतला. । Salman Khan’s house | Mumbai Crime Branch ज्यानंतर या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी पनवेलमधील एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. तर गुन्हे शाखेने तपास करत या दुचाकीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही दुचाकी आपण काही दिवसांपूर्वी विकल्याचे या मालकाकडून सांगण्यात आले होते. हल्लेखोरांनी ही दुचाकी सलमान खानच्या घरापासून थोड्या अंतराजवळ असलेल्या चर्चजवळ सोडून दिली होती. यानंतर ते ऑटोने वांद्रे स्थानकावर पोहोचले व तिथून ते लोकलने गेले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. । Salman Khan’s house | Mumbai Crime Branch ।