मेष : नोकरीत आपला मतलब साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांची खुशामत करावी लागेल. प्रवास घडतील.
वृषभ : निर्णयात गल्लत होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील.
मिथुन : केलेल्या कामाचे पैसे आता मिळतील. तरुणांना हट्टी स्वाभाव उफाळून येईल. सामंजस्याने प्रश्न सोडवा.
कर्क : व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष ठेवावे लागेल. कृती घाईने करून चालणार नाही.
सिंह : खेळते भांडवल वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. महिलांना आत्मिक बळ मिळेल.
कन्या : आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत परदेशगमन व परदेशव्यवहारातील कामांना चालना मिळेल.
तूळ : प्रगतीचा आलेख चढता राहील. मात्र हे करताना प्रमाणाबाहेर जाऊन धावपळ दगदग करू नका.
वृश्चिक : नोकरीत कार्यपद्धतीत बदल करून कामे वेळेत पूर्ण कराल. सहकारी कामात मदत करतील.
धनु : एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल कराल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील.
मकर : पैशाची चिंता मिटेल. घरात मोठया व्यक्तींच्या सूचनांचे पालन करावे लागेल. स्वतःच्या कामांकडे लक्ष द्यावे.
कुंभ : व्यवसायात नियमांचे पालन करून कामाची उलाढाल वाढवा. मनाविरुद्ध वागावे लागल्याने चिडचिड होईल.
मीन : कामगारांना युक्तीने सांभाळावे लागेल. नोकरीत अहोरात्र मेहनत कराल. केलेल्या श्रमाचे चीज होईल.