पुणे : बुधवारी रात्री पुणे शहरात पावसाने 4 तास धुमाकूळ घातला. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. वेधशाळेने पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार आपत्ती निवारण यंत्रणा अलर्ट होती. पण, पावसाचा जोर इतका प्रचंड होता की या 3-4 तासांत शहराचा दक्षिण भाग पूर्ण पाण्याखाली होता.
इतक्या मोठ्या पावसाचे कारण काय? तर, पुणे आणि पुण्याच्या दक्षिण – पूर्व भागावर साधारणपणे ९ ते 12 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. ते कुलाबा वेधशाळेच्या रडारवर दिसून येत होते. साधारणपणे ३ ते ६ किमी उंचीपर्यंत त्यांची घनता जास्त होती. मंगळवार आणि बुधवारी पुण्यात झालेला पाऊस या जास्त घनतेच्या ढगांमुळे आहे, असे हवामान विषयक अभ्यासकांनी सांगितले आहे. त्यामुळे कात्रज- वारजे भागात पावसाचे प्रमाण जास्त होते.
पुण्यावर जलात्कार! संपूर्ण अपडेट एका क्लीकवर