वॉशिंग्टन : तळागाळातील लोकांना आणि गरिबांना आर्थिक मदत व्हावी म्हणून अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात. दानधर्म करणे किंवा देणगी देणे या माध्यमातून ही मदत केली जाऊ शकते पण अमेरिकेतील एका व्यक्तीने मात्र रस्त्यावर वाहन चालवत असतानाच आपल्या गाडीच्या खिडकीतून तब्बल दोन लाख डॉलर्स बाहेर फेकले आणि अशा प्रकारे गरजू व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न केला.
ओरेगॉन स्टेट पोलिसांनी याबाबत माहिती दिली. डेव्हिस मकारथी नावाच्या 38 वर्षे वयाच्या इसमाने हायवेवर चार चाकी वाहन चालवत असताना आपल्या वाहनाच्या खिडकीतून तब्बल दोन लाख डॉलर्सच्या नोटांची उधळण केली. या नोटा वाऱ्यामुळे आकाशातून पडत असताना हायवेवर चालणाऱ्या अनेक वाहन चालकांनी वाहने थांबून या नोटा गोळा केल्या डेव्हिस ला वारसा हक्कने एवढे पैसे मिळाले होते.
त्याची इतरांनाही मदत व्हावी या एकाच हेतूने त्याने गाडीच्या खिडकीतून हे पैसे बाहेर उधळले त्याच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही त्याचा हेतू चांगला असल्याने आम्ही कारवाई करणार नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.
या सर्व घडामोडी मध्ये ओरेगॉन हायवे मात्र दीर्घकाळ जाम झाला होता. उधळलेले सर्व पैसे गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी आता हायवेवर वाहने थांबून पैशाचा शोध घेऊ नये असे आवाहन आता पोलिसांतर्फे करण्यात येणार येत आहे.