नवी दिल्ली – यंदा 20 ऑक्टोबर रोजी मागील वर्षाच्या तुलनेत मालवाहतूकीचे प्रमाण 15 टक्क्यांनी तर त्यातून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण 9 टक्क्यांनी वाढले आहे.
या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने 108 पुर्णांक 16 दशलक्ष टनाची मालवाहतूक केली ही गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील माल वाहतुकीपेक्षा 15 टक्क्यांनी अधिक आहे.
या मालवाहतूकीतून रेल्वेला 10 हजार 405 कोटी रूपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी जेमतेम 868 कोटी रूपये मिळाले होते. रेल्वेकडून सध्या मालवाहतूकीसाठी मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून आला असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
रेल्वे मालवाहतुकीसाठी आणखीही वेगळ्या क्षेत्रातील व्यवसाय मिळवण्याचा प्रयत्न रेल्वे कडून केला जात असून लोखंड, स्टील, सिमेंट, ऑटोमोबाईल, अन्य लॉजिस्टीक सेवा या क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींसमवेत रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.