“एनआयए’ कडून कोईम्बतूरमध्ये छापे; आक्षेपार्ह साहित्य हस्तगत

कोईम्बतूर – “एनआयए’ने कोईम्बतूरमधील शांतीनगर भागात आज काही घरांवर छापा घातला आणि इसिसशी संबंधित काही आक्षेपार्ह साहित्य हस्तगत केले. या साहित्यामध्ये इसिसच्या मोड्युलशी संबंधित काही कागदपत्रे आणि हार्डडिस्कचा समावेश आहे.

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेमागील सूत्रधार झरहान हाश्‍मी याच्या भाषणांचा प्रसार करणाऱ्य सहा जणांना आठवड्याभरापूर्वीच “एनआयए’ने अटक केली होती. या सहा जणांमध्ये मोहम्मद अझहरुद्दीन नावाचा युवक शांतीनगरमध्ये ग्राफिक डिजायनिंगचे दुकान चालवत होता.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे “एनआयए’ने शांतीनगर परिसरात संधू नावाच्या एका सहकाऱ्याच्याही घरावर छापा घातला. त्याच्याकडूनच “एनआयए’ने काही कागदपत्रे आणि हार्डडिस्क ताब्यात घेतली आहे.

तामिळनाडूतील “इसिस’ मोड्युलचा मुख्य सूत्रधार हा श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार झरहान हाशीम याच्याशी फेसबुकवरून संपर्कात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.