मुंबई-अलिबाग लोकल धावणार

विधानसभेत ठराव मंजूर ः एमएमआरडीएचा पालघर ते अलिबागपर्यंत विस्तार

मुंबई – मुंबई शहराची वाढती लोकसंख्या व पायाभूत सोयी-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) हद्द वाढवण्याचा ठराव आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. एमएमआरडीएच्या विस्तारामुळे लोकल ट्रेन थेट अलिबागपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील परिसराचा जलदगतीने विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार करण्याची मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा पैसा केवळ मुंबई व ठाण्यात न वापरता आसपासच्या परिसरात वापरला गेला पाहिजे. पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती.

त्यादृष्टीने मांडण्यात आलेला ठराव दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यामुळे पालघर, वसई, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग आदी तालुक्‍यांचे सर्व भाग मुंबई महानगर प्रदेशात सामिल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)