शिरूर -अण्णापूर (ता. शिरूर) येथे अवैध दारू बनवणाऱ्या दारू भट्टीवर शिरूर पोलिसांची धडक कारवाई 1000 लिटर दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. यामुळे या भागातील अवैध दारू बनवणाऱ्याची धाबे दणाणले आहेत. शिरूर तालुक्यातील अण्णापूर भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू बनवली जाते या ठिकाणी अनेक वेळा कारवाई करूनही अवैध दारू बनवणारे कारवाईला भीत नाही.
शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस नाईक संजू जाधव, कॉन्स्टेबल संजय साळवे, विजय जंगम यांच्या पथकाने अण्णापूर येथील आडरानात सुरू असलेल्या दारू बनवण्याच्या भट्टीवर धडक कारवाई करून तेथे ते एक हजार लिटर दारू बनवण्याचे रसायन एकूण किंमत 32 हजार जप्त करून ते नष्ट करण्यात आले. दारू बनविणारे विकास पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.