पिंपरी – सांगवी येथील कचरा संकलन केंद्रामध्ये बसविलेल्या बायो कम्पोस्टिंग प्रक्रिया प्रकल्पाचे संचलन, देखभाल दुरुस्तीच्या निविदेच्या कामातील अटी शर्तींचे उल्लंघन केल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे. इकोमॅन एन्व्हायरो सोल्यूशन या ठेकेदाराला सहा वर्षांसाठी काळ्या य़ादीत टाकण्य़ात आले आहे. त्यांची अनामत रक्कम जप्त करून पुढील सहा वर्ष त्यांना अशा प्रकारच्या निविदा भरण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने सांगवी येथील कचरा संकलन केंद्रांमध्ये जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच टन क्षमतेचा बायो कम्पोसिंटग प्रकल्प बसविण्याचे काम तळवडे येथील इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदाराला दिले होते.
क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांनी इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदार संस्थेच्या कार्यपद्धती ठीक नसल्याने या संस्थेला कामातून कार्यमुक्त करावे व दुसऱ्या संस्थेला घ्यावे, असे कळविले होते. ही कारवाई पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी केली आहे.