केरळ – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली. आपली उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले. राहुल गांधी यांनी केलेला रोड शो मध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी वढेरा तसेच केरळ काँग्रेसचे स्थानिक नेते देखील उपस्थित होते.
दरम्यान राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पारंपरिक मतदारसंघ अमेठीसह केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी केरळातून निवडणूक लढवत असल्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघाला भलतेच राजकीय वजन प्राप्त झाले असून भाजपासह डाव्या पक्षांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपतर्फे येथील स्थानिक पक्षाचे अध्यक्ष तुषार वेलापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे