कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील वनरक्षक चौकी तपासणी नाका – बंदी दरम्यान नीता ट्रॅव्हल्समधून 19 लाख 50 हजार रुपयाची रोकड जप्त करण्यात आली. नीता ट्रॅव्हल्स मुंबईहुन गोव्यासाठी निघाली असतांना कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील वनरक्षक चौकी तपासणीत संतोष कुमार परमलाल पटेल ( मध्यप्रदेश ) या युवकास पहाटे तीनच्या सुमारास सीआरपीसी पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.