नवी दिल्ली – केंद्र सरकारने बूस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे. हे एक योग्य पाऊल आहे. लस आणि बूस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बूस्टर डोसबाबतच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र याचवेळी या निर्णयाचे श्रेय घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
राहुल गांधी यांनी त्यांचे जुने ट्विटही शेअर केले, ज्यात ते बूस्टर डोसवरून त्यांनी सरकारवर टीका केली होती. करोनाची तिसरी लाट आणि देशात ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले.
केंद्र सरकार ने बूस्टर डोज़ का मेरा सुझाव मान लिया है- ये एक सही क़दम है। देश के जन-जन तक वैक्सीन व बूस्टर की सुरक्षा पहुँचानी होगी।#BoosterJab #VaccinateIndia https://t.co/wUW7eYhEme
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 26, 2021
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बूस्टर डोस देण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि ते सर्व लोकांना देण्यात यावे, असे सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला, केजरीवाल यांनी केंद्राकडे ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत अशा व्यक्तींना कोविड -19 लसीच्या बूस्टर डोसची परवानगी देण्याची विनंती केली होती.