नवी दिल्ली – गोवा या राज्यात कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आमदारांना अज्ञात स्थळी नेण्याची वेळ आली आहे. तिकडे उत्तराखंडमध्ये पक्षाच्या तीन आमदारांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. हे सगळे नाट्य चालले असताना पक्षाचे नेते राहुल गांधी हे आता पुन्हा विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
ते संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर परत येतील, असे सांगण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी कतार एअरलाइन्सच्या फ्लाइटने ते विदेशात रवाना झाले. मात्र कोणत्या देशात गेले हे सांगण्यात आलेले नाही.
गोवा कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; राहुल गांधी मात्र पुन्हा विदेश दौऱ्यावर
संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 6 ऑगस्ट या काळात होणार आहे. त्याच्या अगोदर राहुल परततील असे सांगण्यात आले. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे, तर 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.