राहुल गांधींचे ‘ते’ ट्विट वादात; जम्मू-काश्मीरला दाखवला पाकिस्तानचा भाग

नवी दिल्ली – कोरोना विषाणूने चीनसह जगभरात धुमाकूळ घालत आहे. करोना विषाणूमुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1,113 वर पोहोचली आहे. तर विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 2,015 ने वाढून 44,053 इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मात्र, ही टीका राहुल गांधींनाच महागात पडल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी म्हणाले कि, कोरोना विषाणूचा नागरिक आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे. मात्र, सरकारने याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिलेले नाही. कोरोनाच्या प्रतिबंधांसाठी त्वरित उपाययोजना होण्याची गरज आहे, असे ट्विट केले आहे. या ट्विटसोबत राहुल गांधींनी एक मॅपही पोस्ट केला आहे. मात्र यामध्ये जम्मू-काश्मीरमधील एक भाग पाकिस्तानात दाखवण्यात आला आहे. यावरून नेटकऱ्यांनी राहुल गांधींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर राहुल गांधींनी ते ट्विट तातडीने डिलीट केले.

दरम्यान, युरोपातील फ्रान्स, रशिया, बेल्जियम, स्वीडन, फिनलंड आणि स्पेनमध्येही या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.