पंतप्रधान मोदी माझ्याशी ‘भ्रष्टाचारा’वर चर्चा करण्यास घाबरतात- राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार या मुद्यावर बोलण्याचं आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत चर्चा करण्यास काही पर्याय दिले आहेत. त्यांनी राफेल आणि अनिल अंबानी , नीरव मोदी, अमित शाह आणि नोटाबंदी यासारख्या मुद्दयावर चर्चेसाठी मोदी यांना आव्हान दिले आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की , प्रिय पंतप्रधान, तुम्ही माझ्याशी भ्रष्टाचारावर चर्चा करण्यास घाबरत आहात का.. मी आपल्यासाठी हे सोपे करू शकतो. त्यासाठी पुस्तक उघडून 1. राफेल +अनिल अंबानी 2. नीरव मोदी 3. अमित शाह +नोटबंदी या विषयावर तुम्ही तयारी करू शकता.

राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर भाजप आणि नरेंद्र मोदी या ट्विटला काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, राहुल गांधी यांनी 7 एप्रिल रोजी सुध्दा मोदीनां उद्देशून ट्विट केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, तुम्हा पळून जाऊ शकता पण लपू शकत नाही. तुमचं कर्म तुमचा पीच्छा सोडू शकत नाही. सत्य हे खूप ताकदवान आहे. मी तुम्हाला भ्रष्टाचारावर चर्चा करण्यास आव्हान देतो. तेव्हा भाजपने प्रत्युत्तर देत म्हटले होते की,काँग्रेस अध्यक्ष एक निष्काळजी नेते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.