आंबेठाण- सामाजिक वनीकरण विभाग पुणे, परिक्षेत्र खेड यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटीकेत उच्च तंत्रज्ञानद्वारे रोपनिर्मितीचे काम गोनवडी येथे सुरु आहे. या ठिकाणी 3.5 हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका असून यामध्ये सोलर पॉनलद्वारे वीज निर्मिती केली जाते. या विजेचा वापर करून रोपांना पाणी दिले जाते.
त्याचप्रमाणे या ठिकाणी शेततळे केले असून 2 पॉलिहाऊसद्वारे रोपे तयार करण्याचे कामस सुरू आहे. या रोपवाटिकेमध्ये 6.5 लाख रोपींची निर्मित करण्याची उद्दीष्ट असून त्यासाठी डिसेंबर पासून बीज टाकून रोप निर्मिती करण्यात येत आह. याबाबत वनपाल ए. एम. पवार म्हणाले की, 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी याठिकाणी रोप निर्मिती करण्यात येत असून जुलै महिन्यात सामजिक वनीकरण विभागाद्वारे 2.25 लाख रोपाची लागवड तालुक्यात करण्यात येणार असून उर्वरित रोपे तालुक्यातील ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्था यांना लागवडीसाठी देण्यात येणार आहे.