भोर -जुलै महिन्यात भोर तालुक्यात झालेल्या आतिवृष्टीने भूस्खलनासह शेती, घरेदारांचे प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी अनेक सेवाभावी संस्था मदत कार्यासाठी धावून आल्या. यात रायरेश्वर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी केलेली मदत माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे.
चिपळूण येथे पहाणी दौऱ्यावर आलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे शिलेदारांची भेट घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन कौतुक केले. त्यांचे या कौतुकाने आम्हाला नवी ऊर्जा मिळाली आसल्याचे शिवाजी साळेकर यांनी सांगितले.
रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजी साळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे सारे शिलेदार एकत्र आले व त्यांनी रत्नागिरी, चिपळूण, खेड, महाडसह सांगली, पाटण आणि भोर तालुक्यात सुमारे एक हजार जणांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे गावोगांवात जावून वाटप केले.
याबरोबरच आरोग्य शिबिरांचेही आयोजन आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप केले.
यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनील साने, खजिनदार संतोष शेडगे, कार्याध्यक्ष तुषार साळेकर, प्रमुख प्रवक्ते हभप राहुल महाराज पारठे, शांताई फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा तामकर, जिल्हा अध्यक्ष राहुल कंक, कार्याध्यक्ष सतीश शेलार,
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख धनाजी पवार, तालुका अध्यक्ष गोरख सुतार, उपाध्यक्ष योगेश कोंढाळकर, महिला अध्यक्ष हभप सायली महाराज बांदल, विभाग प्रमुख विकास पवार, सरपंच सागर पांगारकर, हर्षद पारठे, अजय साळेकर, शिवसह्याद्री मेडिकलचे अनिकेत सपकाळ, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.