Rahul Dravid-Anil Kumble voting। लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात, कर्नाटकात शुक्रवारी 543 सदस्यीय संसदेच्या 28 पैकी 14 जागांवर मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता उडुपी चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू उत्तर, बंगळुरू मध्य, बंगळुरू दक्षिण, चिकबल्लापूर, कोलार येथे मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
लोकशाहीत आपल्याला ही संधी मिळते Rahul Dravid-Anil Kumble voting।
आज सकाळी राहुल द्रविडने लोकांना घराबाहेर येण्याचे आणि लोकशाहीचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. मल्लेश्वरम शिक्षा शाळेत मतदान केल्यानंतर द्रविडने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “प्रत्येकाने बाहेर येऊन मतदान केले पाहिजे. लोकशाहीत आपल्याला ही संधी मिळते.” असे म्हटले.
#WATCH | Rahul Dravid casts his vote in Karnataka’s Bengaluru.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/gZ6Ybairc1
— ANI (@ANI) April 26, 2024
पुढे बोलताना, “मला यावेळी बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाची अपेक्षा आहे. तेथे प्रथमच मतदान करणारेही खूप आहेत आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क वापरला पाहिजे. तरुण मुला-मुलींनी मतदान करून मतदान केले तर ते खूप चांगले होईल,” असेही पुढे म्हणाले. द्रविडने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे.
अनिल कुंबळे यांनी देखील केले मतदान Rahul Dravid-Anil Kumble voting।
राहुल द्रविड प्रमाणेच भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी देखील मतदान केले आहे. कुंबळेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात ते त्यांच्या पत्नीसह दिसत आहे. या फोटो सोबत त्यांच्या पोस्टला कॅप्शन दिले, “#Vote #Indiaelections2024 #Karnataka #Bengaluru.”
Bengaluru | Former cricketer Anil Kumble casts his vote in #LokSabhaElections2024 in Karnataka. pic.twitter.com/nLRr133HAc
— ANI (@ANI) April 26, 2024
कर्नाटकात 2019 च्या निवडणुकीत भाजपला 28 जागांपैकी 25 जागा मिळाल्या. यावेळी, भाजप 25 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर त्याचा राज्य सहकारी जेडीएस उर्वरित 3 जागांसाठी लढत आहे. जेडीएसने लढवलेले तीन मतदारसंघ हे दुसऱ्या टप्प्यातील हसन, मंड्या आणि कोलारचे आहेत.