इंदौर – प्रख्यात उर्दू शायर राहत इंदौरी यांचे आज अरबिंदो रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राहत इंदौरी आपल्या अफलातून शेरो-शायरीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या 50 वर्षांच्या काव्यप्रवासा दरम्यान इंदौरी यांनी शेकडो लोकप्रिय गजल, कविता आणि चित्रपट गीते सिनेरसिकांना दिली.
त्यामध्ये “मुन्नाभाई एमबीबीएस’मधील “एम बोलेतो’ आणि “इश्क’ मधील “नींद चुराई..’यासारख्या युवापिढीला भावलेल्या गीतांचाही समावेश आहे. याच वर्षात त्यांनी लिहिलेल्या “बुलाती है मगर जाने का नहीं’ ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. युवकांनी ही कविता अक्षरशः डोक्यावर घेतली होती. त्यामुळे त्यांचे काही गाजलेले लोकप्रिय शेर आज आपण वाचणार आहोत.
बुलाती है मगर जाने का नहीं
ये दुनिया है इधर जाने का नहीं
मेरे बेटे किसी से इश्क़ कर
मगर हद से गुज़र जाने का नहीं
ज़मीं भी सर पे रखनी हो तो रखो
चले हो तो ठहर जाने का नहीं
सितारे नोच कर ले जाऊंगा
मैं खाली हाथ घर जाने का नहीं
वबा फैली हुई है हर तरफ
अभी माहौल मर जाने का नहीं
वो गर्दन नापता है नाप ले
मगर जालिम से डर जाने का नहीं