कामशेत – पिण्यास चहा दिला नाही, म्हणून पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केली. लोखंडवाडी (करूंज) येथील पोल्ट्रीवर काम करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उमा नारायण बोल्ली (वय 39, रा. करूंज, लोखंडवाडी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी राजू नारायण बोल्ली (वय 42) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शंकर रामा लोखंडे (वय 50, रा. लोखंडवाडी, करूंज ता. मावळ, जि. पुणे) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू नारायण बोल्ली याने पिण्यास चहा दिला नाही, म्हणून राग मनात धरत पत्नी उमा नारायण बोल्ली हिला शनिवारी (दि. 1) मारहाण केली. यामध्ये गंभीर जखम झालेल्या उमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.