मुंबई – बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात अभिनेता ‘संजय दत्त’ फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. खुद्द संजय दत्तने मंगळवारी (दि.11) रात्री ट्विटरवरून आपल्या फॅन्सला ही चिंताजनक बातमी सांगितली. संजयचा कॅन्सर तिसऱ्या स्टेजवर पोहोचला आहे.
संजय दत्त म्हणाला की, ‘वैद्यकीय उपचारासाठी मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत. मी लवकरच परत येईन. अशा आशयाचे ट्विट संजू बाबाने केले.
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 11, 2020
दरम्यान, संजूबाबाच्या या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला प्रत्येकजण त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतोय. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने सुद्धा संजय दत्तसाठी एक ट्वीट केले. ‘संजय दत्त तू फाइटर आहे आणि फाइटर राहशील’, अशा शब्दांत युवीने संजयला धीर दिला आहे. युवराजला देखील 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान कॅन्सरने ग्रासले होते.
You are, have and always will be a fighter @duttsanjay. I know the pain it causes but I also know you are strong and will see this tough phase through. My prayers and best wishes for your speedy recovery.
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) August 11, 2020
युराज आपल्या ट्विट मध्ये म्हणाला कि, ‘संजय दत्त तू खरा लढवय्या आहेस आणि नेहमी राहशील. मी यातून गेलोय, याच्या वेदना मी सोसल्या आहेत. पण मला माहित आहे, तू एक खंबीर व्यक्ती आहेस आणि या कठीण काळातून बाहेर पडशील. तू लवकर बरा व्हावास, यासाठी प्रार्थना करतोय.’