मुंबई – बॉलीवूड ब्लॉकबस्टर साऊथ चित्रपटांच्या रिमेकवर पैसे मिळवत असताना, आणखी एक रिमेकची चर्चा सोशलवर तुफान सुरु आहे. अभिनेता आर. माधवन आणि अभिनेता विजय सेतुपती यांच्या तमिळमधील गाजलेल्या “विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान हे दोघेजण लीड रोलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली असून राधिकाने “विक्रम वेधाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मिड-डेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तिने नुकतेच मुंबईत 10 दिवसांच्या शेड्यूलचे शूट पूर्ण केले. याबद्दल बोलताना राधिकाने सांगितले की, तिला विक्रम वेधच्या शूटिंगमध्ये मजा आली आणि यावेळी बोलतांना तिने सैफ अली खानचे कौतुकही केले.
राधिकाने 2018 मध्ये रिलीज झालेल्या बाजार आणि सेक्रेड गेम्स सीझन 1 नंतर सैफसोबत तिसर्यांदा काम केले आहे. या शूटिंग दरम्यानचा अनुभव सांगतांना ती म्हणाली, “मुंबईत 10 दिवसांचे शेड्यूल होते. यावेळी मी सैफसोबत पुन्हा एकत्र काम केले याचा मला आनंद आहे.” असे राधिकाने सांगितले. या महिन्याच्या अखेरीस टीम शूट पूर्ण करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हृतिक या चित्रपटात वेधाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हृतिक आणि सैफची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहे. दोन सुपरस्टार्सला एकाच फ्रेममध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहात.