नवी दिल्ली – देशातील करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 483 नवीन बाधित आढळले आहेत. यादरम्यान, सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. मात्र मृतांच्या संख्येने पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मिळालेल्या आकडेवारीवरून करोनामुळे देशात गेल्या 24 तासांत आणखी 1हजार 399 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृतांच्या आकडेवारीबरोबर देशातील एकूण मृतांची संख्या 5 लाख 23 हजार 622 झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 हजार 483 नवे करोना संक्रमित आढळले आहेत. सोमवारच्या तुलनेत सक्रिय प्रकरणे 886 ने खाली 15 हजार 636 वर आली आहेत. सोमवारी 2 हजार 541 नवे बाधित आढळले होते. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली होती. अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 1 हजार 970 करोनातून रुग्ण बरे झाले आहेत.