नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये यावेळी जोरदार मारामारी झाल्याचे विधानसभेतील व्हिडीओमधून समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपाच्या पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे.
विधानसभेतील व्हिडीओ आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचे दिसत आहे. तसेच शर्ट फाडत असल्याचेही दिसत आहे. “त्यांनी मला ढकललं, शर्ट फाडला,” असे ते व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला.
Absolute pandemonium in the West Bengal Assembly. After Bengal Governor, TMC MLAs now assault BJP MLAs, including Chief Whip Manoj Tigga, as they were demanding a discussion on the Rampurhat massacre on the floor of the house.
What is Mamata Banerjee trying to hide? pic.twitter.com/umyJhp0jnE
— Amit Malviya (@amitmalviya) March 28, 2022
आम्ही बिरभूममधील घटनेवर चर्चेची मागणी करत असताना सत्ताधारी आमदारांनी आम्हाला मारहाण केल्याचं सांगत ते सभागृहातून बाहेर पडले.
निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या आमदारांमध्ये सुवेंद्रू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बर्मन यांचा समावेश आहे.