पोलिसाला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की

पुणे – वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी एमएच 12 आरएच 5726 क्रमांकाच्या दुचाकीवरील दोघांवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुरेश मारकड हे सिंहगड वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते पोलीस फौजदार निढाळकर यांच्यासह संतोष हॉल चौकात रविवारी रात्री वाहतूकीचे नियमन करत होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वाहतूकीस अडथळा करत मारकड यांना अश्लील शिवीगाळ केली.

त्यांना आमच्या खुप ओळखी आहेत, तुझी नोकरी घालवतो अशी दमदाटीही केली. यानंतर त्यांच्या गालावर थापड मारली.

फौजदार निढाळकर मदतीला आले असता, त्यांनाही शिवीगाळ करुन आरोपींनी पळ काढला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.