नारायणगाव (पुणे) – मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या 167 जणांवर कारवाई 33 हजार 400 हजार रुपये व दुचाकी व चारचाकी 101 वाहनांवर कारवाई करून 27 हजार 900 रुपयांचा दंड असा एकूण 61 हजार 300 दंड एका दिवसात नारायणगाव पोलिसांनी वसूल केला. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे यांचा वर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी परिसरात व पुणे-नाशिक महामार्गावर कारवाई केली.