भाजपच्या जाहीरनाम्यात पुणेकरांची “मन की बात’

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघासाठीचा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा येत्या 17 एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या जाहीरनाम्यात, “भारत के मन की बात’ या उपक्रमाअंतर्गत पुणेकरांनी केलेल्या सूचनांचा समावेश असणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीचा जाहीरनाम्याशी संयुक्तिक हा जाहीरनामा असणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.

गोगावले म्हणाले, “भाजपच्या जाहीरनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने 2 वेगळे जाहीरनामे प्रकाशित केले होते. त्यातील एक प्रभागनिहाय, तर दुसरा शहरासाठीचा होता. लोकसभा जाहीरनामा त्या जाहीरनाम्याशी संयुक्तिक असणार आहे. त्यात प्रामुख्याने महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने जे लांबणीवर पडले आहेत. अशा विषयांचा समावेश करून एकात्मिक विकास व नियोजनाचे चित्र स्पष्ट करणारा हा एकत्र जाहीरनामा असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सुमारे 15 हजार पुणेकरांनी काही सूचना केल्या आहेत. त्यातील काही सूचनांचाही यात समावेश केला जाणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.

फडणवीस, गडकरी, पियुष गोयल यांची सभा
प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक सभा होणार असून, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल, विनय सहस्रबुद्धे यांच्याही सभा होणार आहेत. त्यासाठी पक्षाकडून मान्यतांच्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत उमेदवाराचे परिचयपत्र प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्यात येत असून पुढील दोन दिवसांत मतदार स्लीप वाटपाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.