त्रुटी असल्याने विधान परिषद मतदानावेळी पुणेकरांची दमछाक

पुणे – यंदाची पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणूक लक्षणीय ठरली. मोठ्या संख्येने उभे राहिलेले उमेदवार, तर दुसरीकडे नव्याने नोंदणी केलेली मतदार यादी, यादीतील घोळ, केंद्रातील अंतर अशा त्रुटी दिसून आल्या. त्यातच करोनाचे संकट या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान बाहेर काढण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि त्याहून अधिक मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ दिसून आली.

 

 

सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. घरापासून मतदान केंद्र दूर असूनदेखील अनेकांनी तेथे जाऊन मतदान केले. तर, यंदा प्रथमच या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रांच्या बाहेर बूथ लावण्यात आल्याचे दिसून आले. तरुणाबरोबरच अनेक वयोवृद्ध पदवीधर मतदार बाहेर पडल्याचे चित्र अनेक केंद्रावर बघावयास मिळाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर सॅनिटायझर आणि थर्मल गनची सुविधा करण्यात आली होती.

 

पुण्यातील मतदारासाठी पिंपरीत केंद्र

एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर आल्याने त्याचा त्रास मतदारांना सोसावा लागला. शहरातील काही मतदारांना मतदानासाठी पिंपरी-चिंचवडमधील केंद्र आले. खडकवासल्यातील मतदारांना धनकवडीचे केद्र आले. अशा घोळाचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला. मतदान करण्याची इच्छा असूनही लांबच्या अंतरावरील केंद्र आल्यामुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.