पुणे :- व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या एकास डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पाच कोटी रुपयांची उलटी ताब्यात घेण्यात आली. याच्या पासून उच्च प्रतीच सुगंधी द्रव्य आणि परफ्युम तयार केला जातो. जगभरात व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी आहे.
विश्वनाथ रतन गायकवाड(38, रा.गुजरवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीची मंडई येथे पान टपरी असून तो मुळचा लातूरचा आहे.
पुण्यातील अत्यंत रहदारीचा परिसर असलेल्या गुडलक कॅफेच्या पाठीमागील बाजूस व्हेल माशाच्या उलटीची विक्री होत असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना मिळाली होती.त्यानूसार डेक्कन पोलिसांनी सापळा रचून विश्वनाथ गायकवाडला गुडलक कॅफेच्या मागच्या बाजूस ताब्यात घेतले.
गायकवाडची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडील सॅकमध्ये व्हेल माशाची उलटी सापडली. त्या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल पाच कोटी रुपये आहे. भारतासह जगभरात व्हेल नावाच्या माशाच्या उलटीला मोठी मागणी असते.
भारतात उलटीला व्हेल माशाच्या उलटीपासून उच्च प्रतीचं सुगंधी द्रव्य आणि पुढे त्यापासून फरफ्युम बनवण्यात येतो. व्हेल माशाची उलटी आणि माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणं आणि व्यापार करणं कायद्यानुसार गुन्हा आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुँवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, अंमलदार बोरसे, धनश्री सुपेकर, सचिन गायकवाड, रोहित पाथरुट, महेश काळे, धनाजी माळी, दशरथ गभाले यांच्या पथकाने केली