पुणे – दोघा अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना धायरी येथे सायंकाळी घडली. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ओंकार तानाजी लोहकरे (19,रा.रायकर मळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 16 आणि 17 वर्षाच्या मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुले एकाच परिसरात रहातात. त्यांची लहानपणापासून भांडणे आहेत. यामुळे पोलिसांनी त्यांना सुधारगृहात पाठवले होते. तेथेही त्यांची भांडणे होत होती. दरम्यान वर्षभरापूर्वी तिघेही रिमांड होममधून बाहेर आले. मात्र त्यांच्यात वैर कायम होते. दोघाही अल्पवयीन मुलांनी सोमवारी सायंकाळी ओंकारचा पाठलाग केला.
त्याला पहिली गोळी धायरी येथील सिल्हर बर्च हॉस्पिटलजवळ झाडली. मात्र, ती हुकल्याने ओंकारने पळ काढला. यानंतर दुसरी गोळी खडक चौकात मारली. त्यात जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.