वानवडी – शहरातील दुरवस्थेत असलेल्या तलावाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी डिसेंबर २०२३ पुणे महापालिकेच्या भवन विभागाकडून महिन्यांत निविदा प्रकाशित करण्यात आली आहे, तर याच महिन्यांत जलतरण तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्याची नोटीस ही बोर्डवर लावण्यात आली आहे. परंतु, याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
वानवडीतील पालिकेचा कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलाव कधी सुरू होणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. जलतरण तलाव बंद असल्याने अनेक वर्षे निविदा मंजूर होउनही त्याची दुरूस्ती झालेली नाही. वानवडी परिसरातील कै.बापूसाहेब केदारी जलतरण तलाव उन्हाळा आल्याने मुलांना पोहण्यास उपलब्ध होत नाही. दहावी, बारावी व इतर वर्षीक परिक्षा होणार असून उन्हाळा सुट्टीमध्ये मुले जलतरण तलावात पोहण्याची मजा घेतात. याबाबत वानवडी परिसरातील स्विमिंग पुलावर पोहायला येणाऱ्या नागरिकांनी केलेल्या व्हाट्सएप ग्रुपच्या सदस्यांनी वानवडीच्या सहायक आयुक्तांना निवेदन दिले आहे.