हडपसर – रामटेकडी येथून सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीत पाणी नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाइनचे काम अंतिम टप्प्यात आले असून नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. यामुळे नवीन प्रभाग क्रमांक 44 व 46 मधील नागरिकांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे.
काळेपडळ, हांडेवाडी रोड या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी नगरसेवक भानगिरे महापालिका व पाणी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या कामाची पाहणी आज त्यांनी केली. यावेळी महापालिका पाणी पुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर, लष्कर पाणी पुरवठा अधिकारी सुभाष पावरा उपस्थित होते. यावेळी नगरसेवक भानगिरे यांनी सदर कामासंदर्भात अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या. या कामाची गती अशीच राहिल्यास एक-दिड महिन्यांत पाणी पुरवठा सुरू होईल.
रामटेकडी येथे वनविभागाच्या जागेत आठ-दहा झाडांचा अडथळा निर्माण होत होता. आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता करून झाडांचे पुनर्ररोपण करण्यात येत आहे. त्यामुळे पाइपलाइन टाकण्यास परवानगी मिळाली आहे. लाइन जोडण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. सेलेना पार्क येथील पाण्याचा टाकीत पाणी गेल्यानंतर नागरिकांना पाणी पुरवठा होईल तेव्हाच मी स्वस्थ बसेल.
– प्रमोदनाना भानगिरे, नगरसेवक
या परिसराला होणार पाणी पुरवठा…
सलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीत पाणी आल्यानंतर काळेपडळ व हांडेवाडी रोड याभागातील सुभाष पार्क, जैन टाऊनशिप, इशा एम्पायर, इताशा, गिनी संस्कृती, रुणवाल, गंगा व्हिलेज, फिफ्थ अवेन्यू, सिद्धिविनायक विहार, सनराइज, अथर्व ईसीपी वास्तू नमो विहार, अशोका नगर, नीलेश क्लासिक, आशियाना, ड्रीम्सओनीला, ड्रीम्स एलेगन्स, ड्रीम्स एलिना, ड्रीम्स सोलेस, ड्रीम्स आकृती, कोहिनूर, ड्रिम्स इस्टेट, सुयश पार्क, कुमार पेबल पार्क ,समृद्धी, नवरत्न एक्झोटीका, फिलोसिया, मयूर जेमिनी, राहुल ईस्ट व्हा, ऑर्चर्ड, डायनॅमिक, रतन हौसिंग, आयरीन, यशराज प्रिमो, नीलेश समृद्धी, ग्रीन सिटी, मंत्रा मेमोरीज, फ्लोरिस्टा काउंटी, रवी पार्क, ईस्ट, एआरव्ही रॉयल या सोसायट्या तसेच चिंतामणी नगर, सय्यद नगर, गुलामाली नगर, उद्योग नगर, सातव नगर, संतोष नगर, इंदिरानगर, दुगड चाळ आणि परिसराला नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे.