पुणे – दाट धुक्यांमध्ये भुरभुर पावसाला सुरवात झाली आणि शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले आॅईल, कचरा यामुळे रस्ते निसरडे झाले. त्यामुळे सकाळी दुचाकी घसरून अपघात होण्याचा घटना वाढल्या. ठिकठिकाणी घटना घडू लागल्याने सोशल मिडियावर याबाबत संदेश पाठवून नागरिकांना जागृत केले जात होते. ऐन कामाच्यावेळी शहरातील विविध रस्त्यांवर हा गोंधळ सुरू झाला.
सकाळी आठ वाजल्यापसून आॅफीस, शाळा, काॅलेज यासह अन्य कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची गर्दी रस्त्यावर होते. मात्र, मंगळवारी (दि. 9) सकाळीच शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्ते ओले झाले आणि रस्त्यावरील आॅईल पसरले. त्यामुळे वाहने घसरून पडण्याच्या घटना वाढू लागल्या.
पौड रस्त्यावरील कचरा डेपो, कर्वे रस्ता, सिंहगड रोड, राजाराम पुल डीपो रोड, सातारा रोड, हडपसर रोड यासह अन्य मार्गावर ठिकठिकाणी रस्ते निसरडे झाल्यामुळे अपघात घडत होते. यावेळी नागरिकांनी निसरड्या रस्त्यांवर झाडाच्या छोट्या फांद्या किंवा बॅरिगेट लावून रस्ता सुरक्षित करत होते.