पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने वेल्हे तालुक्यातील दापोडे या गावी राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
या शिबिरामध्ये लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती, ग्राम स्वच्छता, मंदीर स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, रस्ते स्वच्छता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता, राजगड किल्ले सफाई आदी प्रकारचे श्रमदान स्वरुपी कार्यक्रम घेण्यात आले. विविध विषयांवर मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित करण्यात आली होती.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मनोज पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत शिंदे, प्रा.सुवर्णा कांबळे यांनी शिबिराचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणीही केली. यावेळी शारीरिक शिक्षण संचालक डॉ.रुपेश थोपटे, प्रा.आप्पाराव चव्हाण, प्रा.बाळू जगताप, प्रा.वर्षाराणी वाघमारे, प्रा.शिवाजी मोटेगावकर, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी शिबिरास भेट देवुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही दिले.